पिंपरी (Pclive7.com):- अमोल थोरात यांची भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांची नियुक्ती केली.
शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी अमोल थोरात यांना नियुक्तीचे पत्र दिले. अमोल थोरात यांचे पक्ष संघटन मजबुतीकरणासह पक्ष बांधणीत मोठे काम आहे. त्यांचे कार्य पाहून पक्षाने थोरात यांची भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, नगरसेवक बाबू नायर, सरचिट्णिस प्रमोद निसळ, शैलाजा मोळक, अमित गोरखे आदि उपस्थित होते.
प्रवक्ते पदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रावसाहेब पाटील दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मी मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन, असे थोरात यांनी सांगितले. पक्षावर बिनबुडाचे आरोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहेत. पक्षाचे काम स्थानिक पातळीवर अधिक चांगले करण्यासाठी आणि शहरवासीयांपर्यंत पोहचविणार आहे, असे त्यांनी सांगितले.
खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, माजी खासदार गजानन बाबर, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, सदाशिव खाडे, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, नगरसेविका अनुराधा गोरखे, अमर मुलचंदानी, राजेश पिल्ले, प्रमोद निसळ यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीसाठी काम करणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.