पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी जागतिक पोलिओ दिनानिमित्त पल्स पोलिओ अभियानाची माहिती देत घरोघरी जाऊन जनजागृती केली. व मुलांना पोलिओ डोस देण्याचा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ पासून पल्स पोलिओची मोहिम सुरु केली. भारत सरकारने या मोहिमेची गांभीर्याने दखल घेत भारताला शंभर टक्के पोलिओ मुक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि. ११ मार्च) संपूर्ण देशात पल्स पोलिओ अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये पाच वर्षाच्या खालील मुलांना पोलिओ डोस देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर, मोरवाडी, दत्तनगर, विद्यानगर,एश्वर्यम सोसायटी, आकुर्डी दवाखाना, संभाजीनगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यातही बालकांना पोलिओ डोस स्वतः अनुराधा गोरखे यांनी जाऊन दिला.






















Join Our Whatsapp Group