पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात २ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते निगडी आणि प्राधिकरण येथील या शाखांचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापनदिन शुक्रवारी संपन्न झाला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात पक्षातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. पक्षाच्यावतीने संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील रूग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ‘प्रभाग तिथे मनसे शाखा’ या संकल्पातून एक नवीन सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक १५ निगडी प्राधिकरण काचघर चौक येथे आणि सत्यम ज्वेलर्स साईबाबा मंदिर चौक निगडी गावठाण येथे मनसेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजू साळवे, रूपेश पटेकर, मयुर चिंचवडे, चंद्रकांत दानवले, राहुल जाधव, सुशांत साळवी, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, रूचा कुलकर्णी, अश्विनी बांगर, विद्या कुलकर्णी, सीमा बेलापूरकर, राजू अवसरे तसेच मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.