चिंचवड (Pclive7.com):- युनिक व्हिजन अकॅडेमी व पवना ग्रुप आयोजित १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रसिद्ध सिने अभिनेते मार्गदर्शक राहुलजी सोलापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काशिधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे पार पडला.

स्व. गजाननजी चिंचवडे यांनी शिक्षणासाठी असणाऱ्या तळमळितूनच पवना एज्यूकेशन व सोशल ट्रस्ट या संस्थेची पायाभरणी मित्र परिवाराच्या सहकार्याने केली. विद्यार्थी व पालक केंद्रबिंदू मानून विविध शैक्षणिक उपक्रम ही संस्था राबवित आहे. गेली १६ वर्ष ही संस्था युनिक व्हिजन अकॅडेमीच्या माध्यमातून १० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करीत असते. इ.१०वी /१२ वी च्या विद्यार्थ्याना त्यांनी व त्यांच्या पालकांनी घेतलेल्या परिश्रमाचे, कष्टाचे कौतुक व्हावे म्हणून हा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.

१० वी /१२ वी नंतर खरे तर करीयरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन लाभणे आवश्यक असते. गजाननजी चिंचवडे यांनी राहुलजी सोलापूरकर यांच्या माध्यमातून करियर विषयक मार्गदर्शन असा कार्यक्रम घेत होते. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पवना ग्रुप करत आहेत.

जगाच्या पाठीवर शिक्षणाची पंढरी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्याची सिस्टर सिटी म्हणजे आपली उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विकसित होत आहे. आपल्या शहरात उद्याची पिढी हे आमचे विद्यार्थी. यांना संस्कारक्षम मूल्याधिष्ठित, परिपूर्ण शिक्षण प्रणाली उपलब्ध करून देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच करियर मार्गदर्शनपर असा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास ३२५ विद्यार्थी व पालक यांनी आपली उपस्थिती नोंदविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत युनिक व्हिजन इंग्लिश मिडीयम संचालिका अश्विनी चिंचवडे यांनी केले. सिने अभिनेते मार्गदर्शक राहुलजी सोलापूरकर यांनी विद्यार्थ्यांना करियरपर मार्गदर्शन केले. पवना ग्रुप सदस्य माणिक म्हेत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पवना ग्रुपचे सदस्य राजेंद्र पवार, माणिक म्हेत्रे, महेश बारसावडे, संतोष राका, लतिश बलकवडे, दुर्गेश देशमुख, सतीश खेडकर व युनिक व्हिजन सर्व स्टाफ आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group