किवळे (Pclive7.com):- किवळे परिसरातील मानाची दहीहंडी असलेल्या मुकाई प्रतिष्ठानच्या वतीने मुकाई चौक किवळे येथे आज भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, मुकाई दहीहंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहिदास तरस, श्री बाबदेव मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुमित तरस यांनी या उत्सवाचे आयोजन केले असून यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील संपन्न होणार आहेत. तर यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान धारावी येथील शास्त्रीनगरच्या गोविंदा पथकाला देण्यात आला आहे. या उत्सवात ५ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

मुकाई प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर चिंचवड विधानसभेचे आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम कुंभार, वाहतूक विभागाचे महेंद्र कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण मराठी सिरीयल पुन्हा कर्तव्य आहेची नायिका अक्षया हिंदळकर, बारबारिक चित्रपटातील अभिनेत्री कोमल सागरे या असणार आहेत. तसेच यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील संपन्न होणार असून जूनियर मकरंद अनासपुरे यांचा कार्यक्रम आणि मायबोली महाराष्ट्राची शान हा ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम देखील असणार आहे.























Join Our Whatsapp Group