पिंपरी (Pclive7.com):- तमसो मा ज्योतिर्गमय.. गडद अंधारानंतर उजेडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी आयोजित केली होती. ही दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालय येथे फोडण्यात आली.

या आगळ्यावेगळ्या दहीहंडीत महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगारी, गुन्हेगारी, महिला तसेच बालकांवरील होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ, युवा पिढीचे नुकसान, महाराष्ट्राचा स्वाभिमानाची गळचेपी, शैक्षणिक दुरावस्था, निकृष्ट दळणवळण, आरोग्य सेवांचा अभाव, सामाजिक अन्याय, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कोलमडलेली अर्थव्यवस्था आदी महाराष्ट्राला भेडसावत असणाऱ्या भीषण समस्यांची दहीहंडी उभारण्यात आली होती.

ही दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली फोडण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, विनायक रणसुभे, गणेश भोंडवे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, कार्याध्यक्ष विशाल काळभोर, वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, उपाध्यक्ष विनोद धुमाळ, माधव पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, सरचिटणीस सचिन गायकवाड, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सचिव योगेश सोनवणे, संघटक राजू खंडागळे,

उपाध्यक्ष अल्प संख्याक राजेश रोचिरामानी, सुशांत महादेव खुरासने, रोहित राहुल जाधव, महेश मोहन कांबळे, राहुल धनवे, मजहर शेख, विजय पिरंगुटे, केतन चव्हाण, आदित्य जाधव, अनिरुद्ध चव्हाण, अरुण थोपटे, विजय बाबर, संदीप धेसाय, ज्ञानेश आल्हाट, सतीश कुदळे, विश्रांती पाडाळे, वंदना आराख, निराशा गौडाडकर, फातिमा शेख, मनीष शेळके आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: अजित गव्हाणेतुषार कामठेपिंपरी चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसुलक्षणा शिलवंत-धरसुलोचना शीलवंत






















Join Our Whatsapp Group