पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गाव येथे संदीपभाऊ वाघेरे युवा मंच्याच्या वतीने आज (दि.२७) भव्य दहीहंडी उत्सव होणार आहे. या दहीहंडी सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय, मराठीतील सिनेतारका साक्षी गांधी, शिल्पा ठाकरे, निशाणी बोरुळे, सोनाली पाटील, ऐश्वर्या शेटे आदी अभिनेत्री दहीहंडीचे प्रमुख आकर्षण आहेत.

पिंपरीतील संदीप वाघेरे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आज सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत दहीहंडी महोत्सव होणार आहे, या दहीहंडी उत्सवाला ७ लाख ७७ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, अमित गोरखे, उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल कलाटे, रवी लांडगे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, संतोष कुदळे, श्रीरंग शिंदे, शैलेश मोरे, संदीप कस्पटे, शितल शिंदे, हर्षल ढोरे, संदीप चिंचवडे, नवनाथ जगताप, निलेश बारणे, सचिन साठे, सुरेश भोईर, विनोद नढे, सिद्धेश्वर बारणे, राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, मीना नाणेकर, गिरिजा कुदळे, ज्योतीका मलकानी, निकिता कदम, सीमा सावळे, मोनिका निकाळजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group