चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत १४ व्यक्तींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण ३५ नामनिर्देशन पत्रे खरेदी केली आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून १४ व्यक्तींनी एकूण ३५ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील –
शंकर पांडुरंग जगताप (भारतीय जनता पार्टी), मोरेश्वर महादु भोंडवे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), ॲड. संदीप गुलाब चिंचवडे (अपक्ष), ॲड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), रविराज बबन काळे (आम आदमी पार्टी), खाजाभाई खाडेलाल नदाफ (स्वराज शक्ती सेना), निलेश शिवाजी रावडे (अपक्ष), अरूण श्रीपती पवार (अपक्ष), हरी तापीराम महाले (अपक्ष), रफिक रशीद कुरेशी (अपक्ष), संतोष श्रीमंत फुलारे (अपक्ष), सचिन अरूण सिद्धे (अपक्ष), नंदू गोविंद बारणे (अपक्ष), अनिल विष्णूपंत देवगावकार (अपक्ष).
























Join Our Whatsapp Group