मेळाव्यात हजारो तरुण सभासदांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे. शंकरभाऊंना मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मताधिक्याने आमदार पदी निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल असा संकल्प, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या हजारो सभासदांनी केला.
पिंपरी चिंचवड शहरातील युवकांच्या रोजगारासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. भारतीय जनता युवा मोर्चा असो की माथाडी व सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन असो शंकरभाऊ नेहमी आमच्या सहकार्यासाठी तत्पर असतात. हीच तत्परता आता आम्ही व आमचे हजारो सदस्य या चिंचवड विधानसभा निवडणुकीत दाखविणार असून यावेळी किमान एक लाख मताधिक्याचा टप्पा ओलांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शंकरभाऊंना आमदार करण्याचे आमचे स्वप्न असून ते स्वप्न २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
देशातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सर्वसामान्य जनता सुखात व आनंदात राहील हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो. त्यामुळे आपल्याला राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची असून जास्तीत जास्त संख्येने सर्वसामान्य जनता मतदानासाठी बाहेर पडेल आणि आपल्या महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करेल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत.
























Join Our Whatsapp Group