चिंचवड (Pclive7.com):- जोरदार शक्ती प्रदर्शनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महारॅलीला सुरुवात झाली आहे. शंकर जगताप आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर हे उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन भव्य महारॅलीचा शुभारंभ होत आहे. त्यानंतर पिंपळे गुरव बस स्टॉप, भगतसिंग चौक, जवळकर नगर येथून पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेल, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तापकीर चौक, काळेवाडी मार्गे थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात येणार आहे.