पिंपरी (Pclive7.com):- नुकत्याच झालेल्या सोळा कुलस्वामिनी महोत्सवात लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे सहसंपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
आठवड्यापूर्वी ब्राम्हणकर यांनी शासनदरबारी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ साठी पाठपुरावा करत मंजुर करून आणल्याने समाजाचे स्वप्न साकार केले, समाजासाठी भविष्यात देखील चांगले उपक्रम राबविण्याचे ध्येय व उद्दिष्टे त्यांनी ठेवली आहेत.
कुलस्वामिनी महोत्सव प्रसंगी मा.अद्यश हेमंत पाटे,ज्येष्ठ समाजबांधव बी.एन.येवले, कार्याध्यक्ष योगेश वाणी, सचिन सोनकुळ, विजय शिनकर, सचिव विजय बागडे, पिंपळे गुरव येथील उद्योजक विजुशेठ जगताप, खजिनदार सचिन अमृतकर, किशोर ब्राम्हणकर, बाळकृष्ण अमृतकर, दिनेश पाटे, अमोल वाणी, किशोर पाचपुते, दीपक नेरकर यावेळी उपस्थित होते.