लोणावळा (Pclive7.com):- लोणावळ्यातील एकविरा गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हुल्लडबाजी चांगलीच महागात पडली आहे. एकवीरा गडावर दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचेचे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहोचली. त्यामुळे मधमाश्यांनी भाविकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक जखमी झाले असून, गडावर एकच गोंधळ उडाला होता.
रंगीत धुराच्या फटाक्यामुळे मधमाश्यांचा भाविकांवर हल्ला
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी गडावर पोहोचली होती. पालखीत सहभागी भाविकांनी मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके लावले. फटाक्यांच्या आवाजाने आणि धुरामुळे मंदिर परिसरातील मधमाश्यांच्या पोळ्याला धक्का बसला. त्यामुळे संतप्त मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले.
एकविरा गडावर फटाका बंदी कायम ठेवण्याची मागणी
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.