गहुंजे (Pclive7.com):- बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट ५ ने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.२) रात्री गहुंजे येथे करण्यात आली. अजय लक्ष्मण म्हेत्रे (वय २६, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार राजकुमार इघारे यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीच्या काठावर गहुंजे येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अजय म्हेत्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत.