पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा असोसिएशनच्या वतीने ॲटलास कॉपकोने आयोजित केलेली सिंहगड चढण्याची ६१ वी स्पर्धा (दि.०५) रोजी अत्यंत आल्हाददायक वातावरणात व उत्साहात पार पडली. आतकरवाडी पासून सुरू झालेली ही स्पर्धा गडावरच्या पार्किंग क्षेत्रामध्ये संपन्न झाली.
ॲटलास कॉपकोच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १६ कंपन्यांच्या एकूण १९० खेळाडूंनी भाग घेतला. “छत्रपती शिवाजीमहाराज की जय” ही घोषणा देत हे सर्व खेळाडू अत्यंत उत्साहात या स्पर्धेमध्ये सामील झाले. या स्पर्धेस पुरुष आणि महिला खेळाडूंचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.ही स्पर्धा वय गट १८-३०, ३१-४०, ४१-५०, ५१-६० व महिला खुला गट अश्या एकूण पाच गटांमध्ये घेण्यात आली. पारितोषक वितरण अमरदीप सिसोदिया (जनरल मॅनेजर, ॲटलास कॉपको व ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लबचे प्रेसिडेंट), ॲटलास कॉपकोचे प्लांट हेड प्रवीणकुमार फटांगरे, ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी दयानंद प्रक्षाळे, ॲटलास कॉपको युनियनचे सेक्रेटरी गणेश गवारी, टाटा मोटर्सचे डीजीएम एचआर अतुल अहिरे, औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर, वसंत ठोंबरे यांच्या हस्ते झाले.
या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन स्वप्निल ब्राह्मणकर व आभारप्रदर्शन संदीप काळे (ॲटलास कॉपको स्पोर्ट्स कमिटी) यांनी केले. पारितोषिक वितरण समयी ॲटलास कॉपको स्पोर्ट्स कमिटीचे तुषार थोरात, संग्राम जगताप, औद्योगिक क्रीडा संघटनेचे हरी देशपांडे, विजय हिंगे, प्रदिप वाघ, बजाज ऑटो आकुर्डी स्पोर्ट्स कमिटीचे अतुल काळोखे, टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण तांबे, सिग्मा इलेक्ट्रिकल युनिट एच.आर.हेड सुयोग फुलबडवे उपस्थित होते. सुदर्शन आहेर, किशोर मुसळे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मदत केली. या स्पर्धेतील खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ॲटलास कॉपकोने रुग्णवाहीकेची खास सोय केली होती. याच स्पर्धेत एनप्रो कंपनीचे डेप्युटी एम डी अनुज करकरे यांनी भाग घेवून, ३१-४० च्या गटात प्रथम पारितोषिक मिळविले.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे..
१) वय गट १८-३०:- १) तेजस मगर (टाटा मोटर्स) ३२मि, २) यशराज हळदकर (टाटा मोटर्स) ३३.९मि, ३) सितांशू लोहार (थायसन कृप) ३५ मि
२) वय गट ३१-४०:- १) अनुज करकरे (एंप्रो) ३३मि, २) विक्रम खरात (टाटा मोटर्स) ३३.२५ मि, ३) प्रमोद उगले (बजाज ऑटो आकुर्डी) ३५मि
३) वय गट ४१-५०:- १) उत्तम भोसले (टाटा मोटर्स) ३३मि, २) निलेश होले (टाटा मोटर्स) ३५.५ मि, ३) वसंत रहाणे (ॲटलास कॉपको) ३६.५ मि
४) वय गट ५१-ते ६०:- १) आनंदा जुनघरे (टाटा मोटर्स) ३१मि, २) विद्याधर राणे (टाटा मोटर्स) ३२.६ मि, ३) गणेश मोरे (बजाज ऑटो आकुर्डी) ३३.३ मि
५) महिला खुला गट:- १) ऋतुजा पाटील (बजाज ऑटो आकुर्डी) ४६.४०मि, २) संगीता मोरे (टाटा मोटर्स) ४८मि, ३) प्रतिभा सरोदे (ॲटलास कॉपको) १मि २से, ४) कमल पवार (बजाज ऑटो आकुर्डी) १ मि १४ से.