पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान गौरव अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आमदार अमित गोरखे यांची निवड केली आहे. गोरखे यांच्यासह धर्मपाल मेश्राम सहसंयोजक, प्रदेश उपाध्यक्ष शशीकांत कांबळे, सहसंयोजक, कु. प्रेरणा होनराव, सहसंयोजक अमित घुगे यांची निवड नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पाठविले आहे.
या निवडीनंतर बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, देशभर “संविधान गौरव अभियान” राबवणार आहोत. या अभियानात सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयात दौरे केले जाणार आहेत. आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मूळ उद्देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे महत्व जनमानसात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हाच आहे.





















Join Our Whatsapp Group