पिंपरी (Pclive7.com):- शरदनगर चिखली येथील स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दि.१० ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवशी सायंकाळी ६ वाजता स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान शरदनगर वीर हनुमान मंदिर स्पाईन रोड सेक्टर-१९ चिखली या ठिकाणी होणार आहे.
या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी (शुक्रवार दि.१० जानेवारी) व्याख्याते प्रा.शंकर नाईकवाडी हे “महाराष्ट्रातील सामाज जीवनामधील स्थित्यानंतर- आज काल आणि उद्या” यांच्याविषयी व्याख्यान देणार आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके, माजी नगरसेविका मंगलाताई कदम, योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, उद्योजक अभय पोखर्णा, मिलिंद वडारकर हे उपस्थित राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी (दि.११ रोजी जाने शनिवार) “उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाची तमा नसते” या विषयावर प्रसिद्ध युवा व्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होईल. यावेळी माजी नगरसेवक नामदेव ढाके, विठ्ठल रा.काळभोर, विष्णू नेवाळे, सचिन सानप, अजय पाताडे, माजी मुख्य अभियंता सुरेश वलेकर आदी उपस्थित राहणार आहे. रविवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कृष्णानगर येथील मयूर हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे
दि.१२ तारखेला स्वामी विवेकानंद जयंती दिवशी प्रा.प्रदीप कदम “स्वामी विवेकानंद -प्रेरणा युवकांसाठी” याविषयावर व्याख्यान देतील. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी (रविवार दि.१२ रोजी) स्वामी विवेकानंद या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी क्रिडा मंत्री नामदार दत्तात्रय भरणे, आमदार महेश लांडगे, आमदार शरद सोनवणे, उप निबंधक नितीन काळे, धर्मादाय निरीक्षक कोल्हापूर शिवराज नाईकवाडे साहेब, माजी नगरसेवक एकनाथ पवार, सुनील लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेली २२ वर्षापासून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याची माहिती स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे यांनी दिली. कार्यक्रम आयोजनासाठी सुनील पंडित, मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर, संतोष ठाकुर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील खंडाळकर, देवराम मेदनकर, दिलीप मांडवकर,अशोक हड़के यांनी पुढाकार घेतला.