पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत मौजे वाकड दत्त मंदिर रोड येथील परिसरात असलेल्या ४५ मी. रस्ता रुंदीकरण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अनधिकृत पत्र्याच्या शेड व आर.सी.सी. बांधकाम असे एकुण ७९ व्यावसायिकांना दि. १४/०८/२०२४ पासुन नोटिसा बजविण्यात आल्या होत्या. ज्या जागामालकांनी नोटिस स्विकारल्या नाहित त्या नोटीसा रितसर डकविणेत आल्या. दि.०३/०१/२०२५ पासुन अतिक्रमण वाहनामधुन अनधिकृत बांधकाम व पत्राशेड काढून घेणेबाबत जाहीर आवाहन करण्यात आले, यामध्ये दि.०६/०१/२०२५ पासुन रस्ता रुंदिकरणाचे कारवाई करणेत येणार असल्याचे प्रत्येक दिवशी सुचीत करण्यात आले.
दि.०६/०१/२०२५ पासुन कारवाईला सुरुवात करण्यात येऊन पहिल्या दिवशी अंदाजे ७० पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली, त्यासाठी २ जे. सी. बी. मशिन व १ पोर्कलेन मशिनचा वापर करण्यात आला. त्यानंतर दुस-या दिवासापासुन निवासी ईमारती व पत्राशेड यावर कारवाई करण्यात आली, यामध्ये २ जे. सी. बी. मशिन, २ पोर्कलेन मशिन व २ ब्रेकर मशिनचा वापर करण्यात आला. सदर कारवाई मध्ये अंदाजे १३७ व्यावसायिक अनधिकृत पत्र्याच्या शेड तसेच निवासी बैठी घरे व दोन व चार मजली घरे १८ आर.सी.सी. बांधकाम व वीटबांधकामांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये अंदाजे ६२,००० चौ. मी. क्षेत्र निष्कसित करण्यात आले.
आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त १ श्री. प्रदिप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त (अतिक्रमण) मनोज लोणकर, ड क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, बांधकाम परवानगी उपभियंता चव्हाण व कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार, बी.आर.टी.एस. विभागचे कार्यकारी अभियंता संध्या वाघ, नगररचना विभागचे उपभियंता अशोक कुटे यांचे नेतृत्त्वात तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे, सुहास भगत, शेषराव अटकोरे, ओंकार ताटे देशमुख, पूजा राठोड (सर्व बीटनिरिक्षक), ‘ड’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे एकुण ३३ महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे जवान, वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कोल्हटकर व त्यांचे ४५ अधिकारी व पोलिस कर्मचारी आणि ७० मजुर यांचे समवेत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.