हिंजवडी (Pclive7.com):- बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेल्या तरुणाचा शरद मोहोळ टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. विकी दीपक चव्हाण (वय १९, रा. घोटावडे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रवी पवार यांना माहिती मिळाली की मेझा नाईन हॉटेल जवळ एक तरुण कमरेला पिस्तुल लावून दुचाकीवरून फिरत आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी सापळा लावून विकी चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली. विकी चव्हाण याचा शरद मोहोळ टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार नरेश बलसाने, कैलास केंगले, मधुकर कोळी, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, रवी पवार, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, मंगेश लोखंडे यांनी केली.