संदिप डोईफोडे (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे) यांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे की, कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजीटल सुविधेचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत, बनावट वेबसाइट, लिंक, किंवा इतर माध्यमांचा वापर करुन नागरिकांची फसवणूक करत असल्याचे गृहमंत्रालय, भारत सरकार तसेच Indian Cybercrime Co- ordination Center (14C) यांचे निदर्शनास आले आहे. तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यावतीने नागरीकांना सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
संभाव्य फसवणूक प्रकारः
१. बनावट वेबसाइटः कुंभमेळ्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइटचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जाते.
२. ऑनलाइन बुकींगद्वारे फसवणूकः भाविकांसाठी निवास व्यवस्था, दर्शन पास इत्यादी बुकींगच्या नावाखाली बनावट वेबसाइट द्वारे पैसे उकळले जात आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन / सुचना:
बनावट लिंक टाळाः कुंभमेळा संबंधी बनावट लिंक, बेवसाईटस किंवा मेसेजवर क्लिक करू नका.
सत्यता तपासाः कुंभमेळा संबंधी अधिक माहीतीसाठी https://kumbh.gov.in अधिकृत वेबसाइट वर संपर्क साधावा
आपली गोपनीय माहिती शेअर करू नकाः बैंक खाते क्रमांक, पासवर्ड, किंवा इतर कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका.
फसवणुकीचा संशय आल्यास सायबर हेल्पलाइन cybercrime.gov.in किंवा 1930 वर संपर्क साधा.
कृपया फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा असे आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.