आळंदी (Pclive7.com):- आळंदी येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले. तसेच यावेळी मुख्यमंत्री यांनी संजीवन समाधीची पूजा केली. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ, भावार्थ देखणे उपस्थित होते. तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, पांडुरंगाच्या आशिर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मला असे वाटते प्रत्येका करता हा क्षण सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवयाला मिळाला आहे. आणि निश्चित पणे पांडुरंगाच्या कृपेने आमची जी परंपरा आहे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगद्गुरु तुकाराम महाराज पर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे. या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे. भविष्यात ही पुढे जात राहील. म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी, याकरता आजच्या भाषेत सांगायचे झाले तर रिचार्ज घेण्या करता येतो.
इंद्रायणीच्या स्वच्छतेचे काम चालू आहे. आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, इंद्रायणी ची स्वच्छता एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. जवळ जवळ सगळ्या शहरांचे, गावांचे उद्योगाचे पाणी हे त्या ठिकाणी जाते. सर्व गोळा करून ते सर्व शुद्ध करून ते इंद्रायणी नदीत सोडायचे आहे.त्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. सगळ्या वेग वेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देत आहोत. उद्योग विभागाला सांगितले गेले आहे.