पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची कासारवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे प्राचार्य ज्योत सोनवणे सर तसेच निदेशक सिद्धार्थ कांबळे, मनसरा कुमावणी, वंदना चिंचवडे, हेमाली कोंडे, सोनाली नीलवर्ण, बबिता गावंडे, पुनम गलांडे तसेच कार्यालयीन कर्मचारी, मोईन शेख, मोहन कुदळे, अनघा लांडे, गणेश गायकवाड तसेच उपस्थित होते.
यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ट्रेड मधील मुलींनी आपले कलागुण सादर करून सावित्रीबाईंना अभिवादन केले. नृत्य, नाटक, वक्तृत्व यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सर्व सहभागी प्रशिक्षणार्थिंना सावित्रीबाईंच्या जीवनावरील पुस्तके देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांनी रोख स्वरूपात रक्कम बक्षीस देऊन प्रशिक्षणार्थिचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन निदेशक हेमाली कोंडे यांनी केले तसेच सूत्रसंचालन पुनम गलांडे यांनी केले. प्राचार्यांनी सर्वांचे आभार मानले.