पुणे (Pclive7.com):- पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली आहे. डॉ. सुहास दिवसे यांच्या जागी आता जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकार बदलल्यानंतर प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आतापर्यंत अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. हर्षदीप कांबळे आणि अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. सुहास दिवसे यांचं प्रमोशन झालं आहे. सुहास दिवसे यांची आता जमावबंदी आयुक्त आणि संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांसहित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी यांचीही बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची बदली करण्यात आली आहे. संतोष पाटील यांची बदली आता साताऱ्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होणार, याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारीपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची आता पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.