पिंपरी (Pclive7.com):- नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सौ. कीर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील थोर महापुरुषांचे पुतळे तसेच स्मारकांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. पार्ट्या जल्लोष या पद्धतीला फाटा देत एक आगळावेगळा उपक्रम कीर्ती मारुती जाधव फाउंडेशन मार्फत सुरू करण्यात आलेला आहे.
या उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेला आवाहन करण्यात आलेला आहे की, महिन्यातून किमान एकदा तरी थोर महापुरुषांचे पुतळे, स्मारक यांची स्वच्छता मोहीम राबवून शहरातील सर्व नागरिकांना एक स्वच्छतेचा संदेश द्यावा.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती जाधव, महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर यशवंत कन्हेरे, युवराज दाखले, बाबू पाटोळे, नाना कांबळे, पांडुरंग पाटोळे, विलास रूपटक्के, गणपत जाधव, धनंजय जाधव, प्रीतम एडके, बाळू भवाळ, रितेश कुचेकर, अभिषेक कदम, सागर मस्के, गणेश मस्के, सेफ खान, निखिल आरणे, सचिन मुरगुंड, अगस्ती घोडके आदींनी सहभाग घेतला.