पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या प्रेम लोक पार्क परिसरात हे बॉम्ब आढळले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपच लिकेज काढण्यासाठी चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथील पाण्याच्या टाकीजवळ खोदकाम सुरू असताना कामगारांना तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळले आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले होते. या बॉम्ब सदृश्य वस्तूंचा कोणताही धोका नसून पोलिसांनी ते लष्कराच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू आहे.