पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत महायुतीच्या नेत्रदीपक विजयाचे श्रेय अजित पवार यांनी पक्षाच्या गुलाबी थीमच्या प्रचाराला दिले आहे.
अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर ‘महाराष्ट्राने गुलाबी रंगाची निवड केली’ अशी पोस्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती-राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेची ऐतिहासिक कामगिरी दिसून येत असतानाच अजित पवार यांनी आपले राजकीय रणनितीकार नरेश अरोरा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यासोबत ५९ जागा लढविल्या असून सध्या ४० जागांवर आघाडीवर आहे.






















Join Our Whatsapp Group