चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे १ लाख ३ हजार ८६५ च्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप यांनी आघाडी घेतली होती. कलाटे यांना शेवटपर्यंत लीड तोडता आली नाही. जगताप यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवत अखेर १ लाख ३ हजार ८६५ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला आहे.
त्यांच्या विजयानंतर चिंचवड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
मिळालेले अंतिम मतदान
शंकर जगताप – २,३५,३२३ (मताधिक्य १,०३,८६५)
राहुल कलाटे – १,३१,४५८
भाऊसाहेब भोईर – ४,३२३






















Join Our Whatsapp Group