पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ४८ लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १७ कोटी ७३ लाख ४३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अमृत योजनेअंतर्गत ६० भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याचे काम चार पॅकजेस मध्ये सुरु असून त्याचे नियोजन आरेखन वॉटर ऑडीवर पाणी गळती शोधणे व कामांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी येणा-या या कामासाठी सुमारे ८ कोटी ९१ लाख ९६ रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजने अंतर्गत इ. १० वी मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ३ हजार रुपयांचे त्यात वाढ करुन देण्यात आली असून प्रत्येकी ६ हजार रुपये अर्थसहाय्य अदा करणे, अपात्रतेची पुर्तता करुन पात्र ठरणा-या लाभार्थींनी प्रति लाभार्थी अर्थ सहाय्य देण्यात आली. येणा-या सुमारे १४ लाख ८२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र १३ निगडी गावठाण येथील सेक्टर क्र २२ मधील स्मशानभुमी समोरील ओटा स्कीम क्र. १ ते ६ च्या अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी येणा-या सुमारे ३८ लाख ८६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१७ मध्ये नविन पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी येणा-या सुमारे ३२ लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१७ मध्ये पेव्हिंग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतींची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४१ लाख ३५ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत बालाजीनगर झोपडपट्टी व उर्वरित ठिकाणी मलनिस्सारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ३९ लाख ६० हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. अ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदार पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणेचे काम करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ३९ लाख ६० हजार रुपयांच्या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली. इ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदार पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणेचे काम करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी १६ लाख ०५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.






















Join Our Whatsapp Group