पिंपरी (Pclive7.com):- पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झालेत. त्यानिमित्त पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भावेश दाणी, अतुल गोसावी, शुभम चिंचवडे, अँड. सुनिल कड, युवराज चिंचवडे उपस्थित होते.
आज देशाच्या राजकारणात सर्वात उंचीवर असणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आहेत. राजकारणात विविध पदावर काम करत असताना त्यांनी सर्वच पक्षात आपली माणसे जोडून ठेवली आहेत. म्हणूनच त्यांच्या सत्कारासाठी संपूर्ण देशातील सर्वच पक्षातील सर्वोच्च पदावरील मान्यवर उपस्थित राहतात. यातूनच त्यांच्या कार्याची उंची दिसून येते. महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण, समाजकारण, क्रीडा, साहित्य अशा प्रत्येकच क्षेत्रात शरदचंद्रजी पवार यांचे कार्य अभिमानास्पद आहे. या देशातील युवकांना त्यांचे विचार कायमच प्रेरणादायी ठरतात. त्यामुळेच पोलीस वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पवार साहेबांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस फ्रेन्डस वेलफेअरच्या कार्याचे शरद पवार यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group