चिखली (Pclive7.com):- चिखली- मोरे वस्ती परिसरातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी युवा नेते यश साने यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यश साने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका हदीतील चिखली- मोरे वस्ती या भागात मुख्य रस्ते, सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन आदी कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या मध्ये अंगणवाडी रस्त्याचे स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम खोळंबले आहे, ते त्वरीत पूर्ण करावे. त्याचबरोबर परिसरातील बहुतांश सोसायट्यंमधील रस्यांची दुरावस्था झाली आहे, या ठिकाणी रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
तसेच काही सोसायट्या मधील ड्रेनेज लाईन जुन्या झालेल्या आहेत. त्या बदलून नवीन ड्रेनेज लाईन टाकाव्यात. तसेच काही सोसायट्यांमधील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी. त्याचबरोबर वाघू साने चौक ते चिंचेचा मळा या रस्त्याचे तातडीने डांबरीकरणाचे काम सुरू करावे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मोरे वस्ती भागातील ही सर्व कामे तातडीने सुरु करावीत आणि नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी यश साने यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group