चिखली (Pclive7.com):- दरवर्षीप्रमाणे कृष्णानगर प्रभाग ११ मधील श्री गणेश मंदिर, महात्मा फुलेनगर येथे दिनांक ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम पार पडला. सौ. पूजाताई महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तीताई जाधव सखी मंच आयोजीत ‘सौभाग्याचे लेणं’ हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
हळदी-कुंकू कर्यक्रमामागील मागील धारणा अशी आहे की, प्रत्येक सुवासिनी ही साक्षात आदिशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना हळद-कुंकू लावताना आपण त्यांच्या माध्यमातून देवीचे तत्त्व जागृत करतो. यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही, तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. या सोहळ्यामध्ये सुवासिनींना वाण देणे, उखाणे, गाणी, खेळ आणि गोडधोड पदार्थांचा आनंद घेतात .
हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे. या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, वाण लुटतात. त्यामुळे त्यांची एकमेकींशी ओळख होते आणि स्नेह वाढतो. माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो. या झालेल्या ओळखीतून महिला एकमेकींना अडचणीत मदत करून पुढे जाऊ शकतात. आपणास काही अडचण जाणवली, समस्या जाणवली तर आवाज द्या मी नक्की तुमच्या अडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल असे सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव म्हणाल्या.
यावेळी कीर्ती मारुती जाधव, मनीषाताई डोंगरे, मेघा देवकर, साई गौर, अंजली कांबळे, वंदना जाधव, वंदना कांबळे, महानंदा चौगुले, सारिका सोनवणे, प्रतिमा टोरपे, पूजा डुंबरे, सारिका आटवाल, जया जाधव, लक्ष्मी काळोखे, यांच्यासह गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.