पिंपरी (Pclive7.com):- जागतिक रंगभूमीवर ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करणारं ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य पिंपरी चिंचवडकरांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. शनिवार दि.८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वा. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हे बालनाट्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. पिंपरी चिंचवड शहरात बाल मनावर नाट्य संस्कार व्हावेत यासाठी निर्मात्यांनी विशेष सवलत या नाटकासाठी ठेवली आहे. बालकांसाठी मोफत आणि पालकांसाठी तिकीट या नाटकाला आकारण्यात येणार आहे. “एक पालक.. एक तिकीट..एक पाल्य” अशी विशेष सवलत देण्यात आली आहे. नाटकाच्या आवडीतून विद्यार्थी कलाक्षेत्राकडे वळावेत. अभ्यासाचा तसेच मानसिक ताण तणाव कमी व्हावा, पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद व्हावा हे या नाट्य प्रयोगाची ध्येय आणि उद्दिष्ट आहेत.
तर मग वाट कसली पाहताय, आजच संपर्क साधा..
8799837727 / 9372243490.
‘अलबत्या गलबत्या’
प्रयोग..
शनिवार ८ फेब्रुवारी, रात्री ९.३० वा.
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड