पिंपरी (Pclive7.com):- जागेच्या वादाच्या कारणावरून दोघांनी एका वृद्धाला चाकूने भोकसण्यात आले. ही घटना सोमवारी (२१ एप्रिल) पहाटे वाघेरे पार्क, पिंपरीगाव येथे घडली. कानियमपाल शंकरण रवी (६५, पिंपरीगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी कानियमपाल यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक जयराज पिल्ले (३०, देहूरोड) आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक आणि फिर्यादी यांचे पती कानियमपाल यांचा जागेच्या मालकीच्या कारणावरून वाद होता. त्यावरून सोमवारी पहाटे दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. प्रतीक याने कानियमपाल यांच्या पाठीत चाकूने भोकसले. तर त्याच्या साथीदाराने कानियमपाल यांच्या पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी प्रतीक पिल्ले याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.