पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २५, मधील वाकड – ताथवडे येथील २४ व १८ मीटर रुंद रस्त्याचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आज झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना गटनेता राहुल कलाटे, नगरसदस्य मयुर कलाटे, अमित गावडे नगरसदस्या अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, प्रमोद ओंभासे, संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कामासाठी सुमारे सहा कोटी पंच्चावन्न लाख रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यामुळे भूमकर चौक ते वाकडकडे येणा-या, जाणा-या वाहनांच्या वेळेची बचत व इंधनाची बचत होणार आहे.






















Join Our Whatsapp Group