पिंपरी (Pclive7.com):- वाकडमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. गुरुवारी (दि.२४) रोजी एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या १८ महिन्यात ही कामे पूर्ण होणार असून या कामांची निविदा रक्कम २६ कोटींच्या घरात आहे.
महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक राहुल कलाटे, स्थायी समिती सदस्य अमित गावडे, नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेविका अश्विनी वाघमारे, रेखाताई दर्शीले, निवृत्ती भुजबळ, अतुल ढवळे, सुरेश रानवडे, महापालिका अधिकारी देवआण्णा गट्टेवार, प्रमोद ओंबासे, संजय कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असणारे रस्ते विकसित करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये वाकड काळाखडक सर्व्हे नं.१२५ पासून वाकड पोलीस ठाणे पर्यंत जाणारा २४ मिटर रस्ता, पुनावळे येथील चार विविध ठिकाणच्या १८ मीटर डीपी रस्त्यांचा समावेश आहे. तसेच अमृतयोजनेअंतर्गत पूनावळे येथे अडीच एकरमध्ये उद्यान विकसित करण्यात येणार आहे त्याची निविदा रक्कम अंदाजे तीन कोटी इतकी आहे.





















Join Our Whatsapp Group