पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ एकाच छताखाली घेता यावा याकरिता आज सोमवार दि.०५ मे रोजी सकाळी १० ते ५ यावेळेमध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. परंतु बऱ्याच नागरिकांना या योजनांची माहिती नसते. तसेच नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना अश्या योजनाचा थेट लाभ मिळण्याकरिता “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच महारष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे, निकिता कदम, प्रसाद शेट्टी, वैशाली खाड्ये, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, विजय जाचक, राकेश मोरे, शेखर अहिरराव, रंजनाताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक असणारे १९६, शैक्षणिक ७५ घरकुल योजनेसाठी ५४ उत्पन्नाचे दाखले देण्यात आले. तसेच ११६ नागरिकांनी आधार कार्ड व नोंदणी लाभ घेतला. याव्यतिरिक्त पास पोर्ट सेवा, आयुष्यमान भारत योजना, ई श्रम कार्ड योजनाचा एकूण ५६६ नागरिकांनी लाभ घेतला. उन्हाळा सुरु असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी ७०X १०० आकाराचा मंडप टाकण्यात आला होता. तसेच नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी कुलर व फॅनची व्यवस्था करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमासाठी शासनाच्या वतीने मंडलाधिकारी संजय सैद, ग्राम महसूल अधिकारी अतुल गीते, सुदर्शन पाटील व वर्षा ढावरे उपस्थित होते. तसेच सहाय्यक दत्ता ढोबळे, अशोक पाटील, तानाजी सर उपस्थित होते. तसेच आधार केंद्रचालक दीपक कांबळे, प्रवीण वडवे, महा-ई-सेवा केंद्रचालक प्रकाश कांबळे, बालाजी पांचाळ व राहुल शिंदे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी संदीप वाघेरे युवा मंच अध्यक्ष हरीश वाघेरे, अनिल रसाळ, किरण शिंदे, शुभम मिटकरी, नितीन पांडूने, विठ्ठल जाधव, हनुमंत वाघेरे आदींनी परिश्रम घेतले.