पिंपरी (Pclive7.com):- नवा व्यापार (ऑफलाईन गेम) खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं. त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला. पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथे असलेल्या विजय प्रभा हाउसिंग सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी १९ वर्षीय सोहेब शेखला अटक करण्यात आली आहे.
१६ वर्षीय गणेश कुऱ्हाडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते. कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली. मात्र खेळता-खेळता वादाला तोंड फुटले, मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली. त्यानंतर खेळ अर्धवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले. कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितले. गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला. लहान असताना जाब कसा काय विचारला? या रागातून सोहेबने गणेशच्या पायात-पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले अन् लाथांनी मारहाण ही केली.

या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीनं रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न ही झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. खरं तर गणेशचा आणि आरोपी सोहेबचा काहीच वाद नव्हता, मात्र भावाला केलेल्या मारहाणीचा त्याने जाब विचारला अन त्याचा यात नाहक बळी गेला आहे. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक श्री. कुंभार हे पुढील तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group