भोसरी (Pclive7.com):- विक्री करण्यासाठी घेऊन चाललेला 2 लाख 39 हजार रुपयांचा गुटखा भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई भोसरी प्राधिकरण येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिओम लक्ष्मण जोगदंड (वय 20) आणि परशुराम प्रदीप ढेपे (दोघेही रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गोरखनाथ गोडांबे (वय 38) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 4.50 च्या सुमारास सृष्टी टेक्नोलॉजी, सेक्टर 07, भोसरी येथे हरीओम जोगदंड आणि पाहिजे आरोपी परशुराम ढेपे यांच्याकडून 2.39 लाख रुपये किंमतीचा गुटखा व 6 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 8.39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group