पिंपळे सौदागर (Pclive7.com):- चंद्र, चांदण्यांशी निगडीत शब्दाविष्कारांना प्रतिबिंबित करणाऱ्या गीतरचना आणि जुन्या जमान्यातील नादमधूर संगीताच्या साक्षीने दुग्धप्राशनाचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांनी कोजागिरी पोर्णिमा उत्साहात साजरी केली. पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दि. ३० रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कुणाल आयकॉन रोडवरील स्व. बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणावर झालेल्या या आनंदमयी सांस्कृतिक सोहळ्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक संदीप काटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांनी या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसोबत ” जो तुमको हो पसंद वही बात करेंगे ” हे गाणे सादर करीत ज्येष्ठ नागरिकांचा आनंद द्विगुणित केला. डॉ. सुभाषचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पी के इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथअप्पा काटे, आनंद हास्य योगा क्लबचे अध्यक्ष दिगंबर राजगुरे, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक वारकर तसेच ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे पदाधिकारी सखाराम ढाकणे, सुभाष पाटील, शकुंतला शिंदे, अनिल कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भामिनी महाले यांनी कोजागिरीच्या औचित्याने कविता सादर केली. त्यानंतर रवींद्र संधानशिवे, अशोक येळंमकर, रेखा येळंमकर,अनिल कुलकर्णी, माधुरी मुलमुले, सुभाष विधाते, शशांक लोकरस, जयपाल सिदनाळे, रमेश चांडगे, अविनाश ईजारदार, सुरेखा पाटील आदिंनी गाण्यांच्या माध्यमातून उपस्थितांचे मनोरंजन केले.
उमेश धूत यांनी “नटसम्राट” या नाटकातील एक प्रसंग सादर केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शकुंतला शिंदे यांनी केले. आभार सखाराम ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनीलकुमार शाह, रमेश वाणी, दिलिप चौगुले, अशोक कलाल, निर्मला कासार, शोभा राजगुरे, पद्मा गवळी, विमल मोंढेकर आदींनी परिश्रम घेतले.


















Join Our Whatsapp Group