चिंचवड (Pclive7.com):- थेरगाव येथील नोबल एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मीबाई बारणे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविल्याबद्दल शाळेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अथर्व फाळके याने ९५.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.

लक्ष्मीबाई बारणे विद्यालयात दहावीच्या वर्गात यावर्षी ३० विद्यार्थी होते. त्यातील सात विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर १६ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतल्याने शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.
संस्थेचे संस्थापक खासदार श्रीरंग बारणे, अध्यक्ष प्रताप श्रीरंग बारणे, सचिव धनाजी बाळाजी बारणे, कार्याध्यक्ष विश्वजीत बारणे, खजिनदार नंदू उर्फ शरद नारायण जाधव, मुख्याध्यापक जगदीश पवार यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.