मोशी (Pclive7.com):- आर्थिक कारणावरून पाच जणांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.१६) पहाटे तीन वाजताच्या सुमारास मोशी ग्रँड हॉटेल समोर घडली.
पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी ग्रँड हॉटेल समोर कोयत्याने वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे (चिंबळी, खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले. यामध्ये पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत.अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद (सर्व रा. चिंबळी, खेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्थिक वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक माहिती असल्याचे उपायुक्त पवार यांनी सांगितले.