भोसरी (Pclive7.com):- भोसरी हुतात्मा चौक येथे श्री. म्हसोबा देवस्थान मित्र मंडळ व शंभूराजे राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड यांच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जम्मू काश्मीर येथील पहेलगाम हल्ल्यानंतर नागरिक तसेच भारतीय जवानांसाठी रक्ताची गरज भासू शकते या दक्षतेसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संभाजी महाराज जयंती निमित्त म्हसोबा देवस्थान मंदिर हनुमान कॉलनी ४ हुतात्मा चौक भोसरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिरादरम्यान 25 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. या शिबिरासाठी परिसरातील किरण भालेकर, दर्शन भुजबळ, स्वप्नील होरे, वरून गोरडे, स्वराज कराळे, ओंकार जगताप,तेजस गायकवाड,आयुष बाणेकर विशेष सहकार्य केले.