पिंपळे सौदागर (Pclive7.com):- दरवर्षी प्रमाणेच पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलने यंदाही सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के तर, बारावीचा ९८ टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. चॅलेंजर पब्लिक स्कूलने दहावीत सतत पाच वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता बारावीतील सिद्धी पाटिल हिने ९९.४० टक्के गुण मिळवीत प्रथम तर, अमन किशोरे याने ९७.८० टक्के गुण मिळवीत द्वितीय, परी अग्रवाल ९७.६० टक्के मिळवीत तृतीय आणि पलकप्रीत भुल्लार ९७.२० टक्के, सारा देशपांडे ९५.६० टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर, दहावीच्या परीक्षेत चिन्मय भुते याने ९७.६ टक्के गुण मिळवीत प्रथम तर, श्रावणी बडगुजर हिने ९६.८ टक्के गुण मिळवीत द्वितीय, अद्विका डावखरने ९६.२ टक्के मिळवीत तृतीय आणि जान्हवी जोशी हिने ९५.६ टक्के, भव्यादित्य मोहंतीने ९५ टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे.
याबाबत संस्थेचे संचालक संदीप काटे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. मुलांच्या यशामागे शाळेच्या शिक्षकांचेही तेवढेच कष्ट आहेत. गुणवत्तेत आणखी सुधारणा कशी होईल? यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते. पालक आणि शिक्षकांमधील समन्वय आणि विश्वासाच्या बळावरच हे यश प्राप्त झाले आहे. संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आली आहे. हा उल्लेखनीय टप्पा विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटीचे, पालकांच्या अटळ पाठिंब्याचे आणि शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. शाळेने ज्या उत्कृष्ठतेचे आणि सचोटीचे मानक राखले आहे, ते कायम ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने आम्हाला अभिमानित केले आहे, असे गौरवोद्गार काटे यांनी यावेळी काढले आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले मॅडम, शिक्षक आणि पालक यांचाही या यशात बहुमोल वाटा आहे.