पिंपरी (Pclive7.com):- संत तुकारामनगर येथील एका टपरीधारकाने आज (सोमवारी) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्याला त्रास देणा-यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यात एका स्थानिक नगरसेविकेचे देखील नाव असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर पोलीस हे प्रकरण दाबून टाकत असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे. सचिन ढवळे असे आत्महत्या केलेल्या टपरीधारकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ढवळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये स्थानिक नगरसदस्याचे नाव आहे. त्यामुळे पोलीस ती चिठ्ठी लपवत आहेत. तसेच पोलीस सचिन यांचा मृतदेह नेण्यासाठी दबाव आणत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सचिन यांची संत तुकाराम नगर परिसरात एक टपरी होती. त्यावरून त्यांना काही लोकांनी मोठ्या प्रमाणात त्रास दिला होता. त्याबाबत मयत सचिन यांची पत्नी शशिकला ढवळे यांनी आपल्या पतीला नगरसेविका सुजाता पालांडे, सुनिल पालांडे, अमय बिर्जे, विक्की शर्मा यांच्या कडून त्रास होत असल्याची लेखी तक्रार ९ एप्रिल रोजी संत तुकारमनगर पोलीस चौकीत दिली होती. तसेच पतीला संरक्षण देण्याची मागणी देखील केली होती. मात्र पोलीसांनी राजकीय दबावापोटी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान त्याच्यांच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.
याबाबत स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. त्या म्हणाल्या की, मयत सचिन ढवळे यांना मी ओळखत होते. परंतू मी त्याला त्रास देण्याचा काहिच संबंध नाही. विरोधकांनी राजकीय सुड उगारण्याच्या उद्देशाने या प्रकरणात माझे नाव गोवण्यात येत आहे. त्यांच्या आत्महत्येचा आणि माझा काहीही संबंध नाही.
























Join Our Whatsapp Group