

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याकरीता आणि हरकती मागविण्याकरिताच्या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप अधिसूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या website वर आणि मुख्य कार्यालयात आज (दि.२२) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सन २०१७ ला होणारी निवडणूक आता होत असल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रभागरचना कशी असणार, याबाबत तर्क-विर्तक लढविले जात होते.

आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे आज (दि.२२) प्रसिद्ध करून त्यावर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, नवीन प्रभाग रचना फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीनुसारच आहे. दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.

दि.०४ सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार
प्रारूप प्रभाग रचनेसाठी नागरिकांना ०४ सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे.
५ ते १२ सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी होणार आहे. १३ ते १५ सप्टेंबर सुधारणा सह अंतिम प्रभाग रचना सादर करणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक अधिसूचनेतील महत्त्वाचे मुद्दे:
-
प्रारूप प्रभाग रचना आजपासून प्रसिद्ध
-
4 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी
-
महापालिकेच्या संकेतस्थळावर व मुख्य कार्यालयात अधिसूचना उपलब्ध
-
नागरिक, संस्था व राजकीय पक्षांना हरकती नोंदविण्याची संधी
-
अंतिम प्रभाग रचना हरकतींच्या अन्वयार्थ निश्चित केली जाणार
प्रभाग रचनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
३२ प्रभाग : पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण ३२ प्रभाग असतील.
४ सदस्यीय प्रभाग : प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जातील.
१२८ जागा : या रचनेत एकूण १२८ जागा उपलब्ध होतील
४ सदस्यीय प्रभाग : प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जातील.
१२८ जागा : या रचनेत एकूण १२८ जागा उपलब्ध होतील