

पिंपरी (Pclive7.com):- रत्नदुर्ग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सेक्टर-12 ,प्राधिकरण ,भोसरी, पुणे-26 आयोजित “जागर सुवासिनीचा ..खेळ मंगळागौरीचा” कार्यक्रम (दि.२४) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका तृप्ती शिर्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पावसाची संततधार चालू असल्याने सुरूवातीला हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. या कार्यक्रमाला सजना चित्रपटाची अभिनेत्री तृप्ती मोरे उपस्थित राहणार होती, त्यामुळे महिला वर्ग अतिशय जोशात होता. परंतु पावसाने काहीसा हिरमोड केला.

महिलांनी कार्यक्रमासाठी बरेच दिवस तयारी केली होती. त्यामुळे रविवार दि.२४ रोजी पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने कमी वेळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

सर्व सहभागी महिलांना सूर्या इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून ५०० रुपयांचे गिफ्ट व्हावचर तृप्ती शिर्के यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार कैलास भुजबळ, धनाजी पाटील आणि अनिकेत उत्पात यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.

संस्थेच्या वतीनं स्नेहा इंद्राळे यांनी शाल श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी कळमकर यांनी सर्वांचं कौतुक केले आणि उपस्थितांचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group