
पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया.. चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचे बुधवारी उद्योगनगरीत आगमन झाले. ठिकठिकाणी मिरवणुकीद्वारे गणरायाला मोठ्या उत्साहात घरी आणण्यात आले. घरगुती गणपतींची सकाळी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुपारनंतर गणरायाची प्रतिष्ठापना केली. वरुण राजाचा अभिषेक, गणेशक्तांच्या अभूतपूर्व उत्साहाने उद्योगनगरी गणेशमय झाली आहे.

यंदा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मोठा उत्साह दिसून येत आहे. घरगुती गणपतीची स्थापना सकाळपासूनच सुरू होती. तर सार्वजनिक उत्सव गणेशोत्सव मंडळाना पुढील दहा दिवसांसाठी मोठा उत्साह संचारला असल्याचे दिसून आले.

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
आज पावसाने उघडीप दिली. त्यामुळे गणरायाची मूर्ती घरी आणणे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेतही गणेश भक्तांची लगबग दिसून आली. सकाळीच गणेशभक्तांनी घरगुती प्रतिष्ठापना केली. बाप्पाची सजावट करण्यासाठी कुटुंबातील नागरिकांची धावपळ सुरु असल्याचे दिसून आले. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बाप्पांची प्रतिष्ठापना केली.























Join Our Whatsapp Group