पिंपरी (Pclive7.com):- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या 2026-28 या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या संतोष कदम यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर येथील दत्त मंदिर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला कॅप्टन श्रीपत कदम, अशोक कदम, उद्योजक मनोहर यादव, कोकण विकास महासंघाचे युवक अध्यक्ष गजानन मोरे, उद्योजक ज्ञानेश्वर कदम, पंधरा गावांचे माजी अध्यक्ष व सचिव नाना उतेकर, संदीप साळुंखे, रुपेश मोरे, अभिजीत कदम तसेच कोकण खेड युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना संतोष कदम यांनी कोकणातील युवकांना एकत्रित करून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. युवकांच्या सहभागातून संस्थेची ताकद वाढवून समाजहिताची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप कदम आणि सूरज उतेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंकुर चव्हाण यांनी केले.

नवनिर्वाचित कार्यकारिणी..
प्रदेशाध्यक्ष: संतोष कदम
उपाध्यक्ष: अनिल पालांडे
कार्याध्यक्ष: अंकुश चव्हाण
सचिव: नंदकुमार महाडिक
सहसचिव: संकेत कदम
खजिनदार: अरुण यादव
सहखजिनदार: प्रकाश आखाडे
उत्सव समिती प्रमुख: समीर चव्हाण.




















Join Our Whatsapp Group