पिंपरी (Pclive7.com):- प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराना चाकूने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. वाकड येथील एका लॉजमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचं दिलावर सिंगचा हॉटेल व्यवसाय आहे. त्याने देहूरोड परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय प्रेयसीचा खून केला आहे. मृत तरुणीचं नाव मेरी तेलगू असं असून, ती डी-मार्टमध्ये काम करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा वर्षांपूर्वी दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर हळूहळू ही ओळख मैत्री आणि प्रेमात बदलली होती. १० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. दिलावरने तिचा वाढदिवस वाकड (काळा खडक) येथील एका लॉजवर साजरा केला. दिलावरने मेरी फोन तपासला असता तिचे दुसऱ्या एका सोबत अश्लील फोटो फोन मध्ये आढळले त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. संशय आणि रागाच्या भरात दिलावरने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेच मेरीवर वार करून तिचा खून केला.
या घटनेनंतर आरोपी दिलावर थेट कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात मेरी इतर एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा संशय दिलावरला असल्याचं समोर आले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.