चिंचवड (Pclive7.com):- स्नेहा कलाटे यांच्या नागरी संवाद दौरा – जनआशीर्वाद दौऱ्याअंतर्गत त्यांनी प्रभाग क्रमांक २६ मधील वेणू नगर परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आपुलकीने त्यांचे स्वागत केले असून दिवसेंदिवस त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे.

या भेटींमागील उद्देश म्हणजे प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या मनातील प्रभागाच्या विकासाची संकल्पना जाणून घेणे हा होता. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर नागरिकांनी आपल्या अपेक्षा व सूचना मांडल्या. प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांचे योगदान तितकेच महत्त्वाचे असून, त्यांना विश्वासात घेऊन विकास साधल्यास तो सर्वांगीण व शाश्वत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, प्रभाग क्र.२६ मधून स्नेहा कलाटे यांची उमेदवारी भाजपाकडून निश्चित मानली जात असून, त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्यामुळे त्या प्रबळ दावेदार ठरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी त्या विजयी होतील, असा विश्वासही या प्रसंगी व्यक्त केला.
Tags: Sneha Kalate






















Join Our Whatsapp Group