पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने थेट अजित पवारांशी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांची गुप्त बैठक झाली आहे. पक्षाने अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी टाकताच, त्यांनी थेट अजित पवारांशी गुप्त बैठक घेतली आहे.

‘या’ विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती..
पिंपरी चिंचवडमध्ये फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र गेलो तर किती जागा शरद पवारांच्या वाट्याला येणार अन् मविआसोबत लढायचं तर किती जागा सर्व घटक पक्षांना मिळतील?
अजित पवारांच्या गटाचे इच्छुक ज्या जागेवर लढण्यास तयार आहेत, त्यातील काही ठिकाणी शरद पवारांच्या इच्छुकांचा दावा आहे, हा तिढा कसा सोडवायचा?
अशा परिस्थितीत चारच्या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार लढवायचे असतील तर स्वतंत्र चिन्हावर लढवायचे की फक्त घड्याळ चिन्हावर लढायचं?
काही प्रभाग फक्त तुतारीच्या चिन्हाचे करता येतील का? अजित पवार गटाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढतील का?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेच तर मविआचे घटक पक्ष सोबत घ्यायला हवेत, असं शरद पवार राष्ट्रवादीचा आग्रह आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना मविआत फूट पडू नये, या दृष्टीने शरद पवार राष्ट्रवादी पावलं टाकू इच्छिते, मात्र ते अजित पवारांना मान्य होईल का? यावर दोन्ही राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून आहे.






















Join Our Whatsapp Group